breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,19,858 वर

मुंबई – रविवारी दिवसभरात आढळलेल्या 5,092 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,19,858 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 8,232 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 110 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,77,322 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 45,250 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 96,372 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 998 नवे रुग्ण आढळले, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 865 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,64,543 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,442 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 2,36,522 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 16,859 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 523 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,28,089 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 8,079 इतका झाला आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 523 रुग्णांपैकी 217 रुग्ण हे पुणे शहरातील असून 123 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,63,274 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडची रुग्णसंख्या 88,802 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button