breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करावी – सभापती शिवाजी गायकवाड

तुळजापूर | महाईन्यूज |

  • तुळजापूर पंचायत समिती परिसरात महिलांसाठी सोयीसुविधा युक्त हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जिल्ह्यामधील सर्व पंचायत समिती कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचारी ग्रामसेविका, उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला भगिनी, पंचायत समिती सदस्या,जि.प.सदस्या,कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या यांच्यासाठी मूलभूत सोयी सुविधायुक्त अशा हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. कक्षाचे उद्घाटन दि.30 डिसेंबर रोजी सभापती शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

तुळजापूर पंचायत समिती ही बसस्थानक शेजारी असून ग्रामीण भागातील दैनंदिन शासकीय कामानिमित्त येणारे व पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागातील महिला कर्मचारी व महिला सरपंच ,महिला लोकप्रतिनिधी यांची मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने महिलांची गैरसोय होत होती पण आता हिरकणी कक्षाची निर्मिती झाल्याने सोय होणार आहे, हिरकणी कक्षाची निर्मिती करण्याचे मत सभापती शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं… या हिरकणी कक्षात महिलांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी,बैठक व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा देणार असल्याचे माहिती सभापती शिवाजी गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली.

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.सतिश महामुनी,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,साप्ताहिक संपादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बनसोडे,अनिल आगलावे, सहायक प्रशासन अधिकारी विजय देशमुख,कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती सारिका दराडे,वरिष्ठ सहायक संगीता दूधभाते,कनिष्ठ सहायक कौशल्या सरडे, कनिष्ठ सहायक कल्पना शिंदे,ललिता राठोड,शशिकला कदम,कृष्णा डोईफोडे, दिलीप सुरते,लिंबाजी लोहार,मल्लिनाथ स्वामी,विष्णू दळवी आदींची उपस्थिती होती.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button