आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मार्च 2020 नंतरचा सर्वाधिक रिकव्हरी रेट, 156 दिवसांतील निच्चांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या

पिंपरी चिंचवड | भारतात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रिकव्हरी रेट वाढला आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.68 टक्के एवढा असून, गेल्या वर्षी मार्च 2020 नंतर पहिल्यांदा सर्वाधिक रिकव्हरी रेट नोंदवला गेला आहे. तसेच ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील कमालीची घटली असून, सध्याची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या मागील 156 दिवसांतील निच्चांकी आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 25 हजार 467 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 19 हजार 551 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 24 लाख 74 हजार 773 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 17‌ लाख 20 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 39 हजार 486 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.गेल्या 24 तासांत देशभरात 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 35 हजार 110 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 50 कोटी 93 लाख 91 हजार 792 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 47 हजार 526 नमूने तपासण्यात आले आहेत.लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 58 कोटी 89 लाख 97 हजार 805 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत 63 लाख 85 हजार 298 जणांना लस टोचण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button