breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रशियाकडून भारताला मिळणार लशीचे १० कोटी डोस

मॉस्को – भारतात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रशियाकडून भारताला १० कोटी लशीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. भारतातील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीला लस पुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबईत स्वप्नातलं घर पाहताय? हीच आहे योग्य वेळ
भारताच्या रेग्युलेटरी ऑथॅरिटीने परवानगी दिल्यानंतर लस पुरवठा करण्यात येणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) भारतीय उत्पादकांशी लसीचे ३०० दशलक्ष डोस उत्पादन करण्याचा करार केला आहे. डॉ. रेड्डी लॅबोरेटरी ही भारतातील एक प्रमुख औषध कंपनी आहे. रशियन लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडून घेण्यात येणार आहे. भारतात २०२० या वर्षाच्या अखेरीस लस पुरवठा सुरू होऊ शकतो असे ‘आरडीआयएफ’ने म्हटले आहे. लस पुरवठ्याबाबत भारतातील नियामक प्राधिकरणाची परवानगी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button