आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिवाळ्यात पालक आणि हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यदायी

पालकासोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास

महाराष्ट्र : हिवाळ्यात पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यदायी असते. तसेच हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिरवा पालेभाज्या बाजारात विक्रीस येतात. या भाज्यांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. हिवाळ्यात पालकापासून पुरी, भाजी, पकोडे, भजेसुप यासारखे अनेक विविध पदार्थ बनवले जातात. पण काही पदार्थांसोबत पालक खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तज्ज्ञांनी सांगितले की पालकासोबत पुढील काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, ज्यामुळे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

तीळ
पालक आलू टिक्की किंवा कोणत्याही प्रकारचा स्नॅक्स बनवताना पालकात तीळ मिसळणे टाळावे. आयुर्वेदानुसार तीळासोबत पालक खाणे हानिकारक ठरते. तीळ आणि पालक एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते . त्यामुळे पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या वाढू शकतात.

पनीर
पालक पनर हा आपल्या देशात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, दुधापासून बनवलेल्या चीजसोबत पालक खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

पालक अशा भाज्यांपैकी एक आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. दुधात आढळणाऱ्या कॅल्शियमवर लोहाची प्रतिक्रिया होऊ शकते. यामुळे या दोन गोष्टींचे पोषक तत्व शरीर शोषून घेऊ शकत नाही किंवा पचनसंस्था पचवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

दही
हिवाळ्यात दही आणि पालक कढी किंवा पालक रायता खायला आवडत असेल तर तुम्ही या फूड कॉम्बिनेशनपासून दूर राहिले पाहिजे. वास्तविक, आयुर्वेदात पालक आणि दही एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक दहीमध्ये कॅल्शियम असते, तर पालकामध्ये लोह असते. या दोन गोष्टी शरीरात एकमेकांच्या शोषणात अडथळा आणू शकतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button