TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय लोकांपेक्षा जपानी लोक जास्त का जगतात?

जपान देश हा भरपूर वर्ष जगणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षीही हे लोक पंचवीशीतील वाटत असतात. त्याचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीत दडलेले आहे. या जीवनशैलीमुळेच ते दीर्घायुष्यीही बनतात व त्यांच्या शरीरावर वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसत नाहीत. जपानचे आयुर्मान सुमारे ८४ वर्षांचे आहे, जे भारतीयांपेक्षा सुमारे चौदा वर्षे जास्त आहे. जपानमध्ये असे लोक आहेत ज्यांचे शंभरपेक्षा जास्त वय आहे.

जपानी लोकांच्या तरुणपणाचे आणि निरोगी आयुष्याचे रहस्य हे आहे की ते अतिशय संतुलित आहार घेतात. त्यामध्ये सी फूड, सोया उत्पादने, आंबवलेले अन्न, भरपूर भाज्या आणि निरोगी चहा यांचा समावेश होतो. ते अन्न व्यवस्थित चघळून खातात आणि त्याचा आनंद घेतात. अन्न नीट चघळणे चांगल्या पचनासाठी महत्त्वाचे ठरते. जपानी लोक भुकेपेक्षा अधिक खात नाहीत. गरजेपेक्षा अधिक अन्न पोटात जाऊ नये यासाठी ते लहान प्लेटस्, वाट्या आणि चॉपस्टिक्सचा वापर करतात.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत छगन भुजबळ यांचं मोठं विधान; म्हणाले..

जपानी लोक कॉफीपेक्षा चहा अधिक पितात. हा चहा औषधी वनस्पतींनी बनवलेला असतो. त्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंटस् असतात जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात व चेहर्‍यावरील वृद्धत्वाच्या खुणा दूर ठेवतात. जपानी लोकांच्या नाश्त्यात उकडलेले तांदूळ आणि लापशी, सूप किंवा मासे असतात. ते तेलाऐवजी अन्न वाफवून, आंबवून, उकळून खातात. वाहनाऐवजी ते चालणे अधिक पसंत करतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button