वडापाव खाताय! चटणीत निघाल्या अळ्याच अळ्या
नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट
मुंबई : डोंबिवली पश्चिमेकडील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नेहमीप्रमाणे, स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी पोटपूजा करण्यासाठी या प्रसिद्ध दुकानातून वडापाव खरेदी केला. वडापाव खात असताना, त्यामधील चटणी नीट पाहिल्यानंतर त्यांना त्यात हालचाल करणाऱ्या अळ्या दिसल्या! हा प्रकार पाहून भाजी विक्रेत्या महिला ग्राहकांनी तात्काळ हा वडापाव टाकून देत, दुकानात गोंधळ घातला या संतापजनक घटनेची माहिती परिसरात दिली.
हेही वाचा : “पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात”; राहुल गांधींची टीका
यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी जराही वेळ न घालवता, त्वरित ही बाब कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.राजेश सावंत यांनीही कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, तात्काळ या स्थळाची पाहणी केली. पाहणीत प्रकार सत्य असल्याचे लक्षात येताच, त्यांनी अन्या व आरोग्य विभागाला सूचित करून संबंधित ‘गजानन वडापाव’चे दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. सध्या अन्या व आरोग्य विभाकडून संबंधित खाद्यांचा सॅम्पल नेततपासणी करण्यात येत आहे या तपासणी नंतर योग्य करवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सागितले.




