Blood Group : ‘हा’ दुर्मिळ रक्तगट तुमचा तर नाही ना! जगभरात आहेत फक्त ९ डोनर
![This rare blood type is not yours, there are only 9 donors in the world](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Blood-Group--780x470.jpg)
Blood Group : आपण म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्ताचे आपल्या शरीरासाठी असणारे महत्व जनजागृतीच्या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मध्यंतरी सलमान खानचा सुलतान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमान खानच्या या चित्रपटात ‘O-‘ रक्तगटाचे महत्व कसे आणि काय आहे चांगल्या प्रकारे उलगडून सांगण्यात आले होते. अशाच प्रकारचा अजून एक ब्लड ग्रुप आहे जो खूप नगण्य किंवा बोटावर मोजण्याइतक्याचा लोकांमध्ये आढळून येतो. हा ब्लड ग्रुप खूपच रेअर असून या ब्लड ग्रुपचे नाव आहे ‘गोल्डन ब्लड’ आणि RH नल असे आहे. तर आज जाणून घेऊयात या दुर्मिळ रक्तगटाविषयी विस्तृत माहिती या लेखाच्या माध्यमातून.
A, B, AB आणि O असे एकूण चार मुख्य रक्तगट असून त्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन ब्रांच आढळतात. या दोन ब्रांचच्या अंतर्गत अजून चार उपप्रकार येतात. असे मिळून एकूण आठ रक्तगट आपल्याला पाहायला मिळतात.मुख्यत्वे करून असे हे आठ रक्तगट सर्वश्रुत आहेत. मात्र १९५२ साली या आठ रक्तगटांमध्ये अजून एक रक्तगटाची भर पडलेली पाहायला मिळत आहे. यात अजून एका रक्तगटाची नोंद झाली असून त्याला ‘बॉंबे ग्रुप म्हणून देखील ओळखले जाते. ‘बॉंबे ग्रुप’ हा अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ असा रक्तगट आहे. जगभरातील हा रक्तगट असणाऱ्या लोकांचा विचार केला तर १० लाख लोकांच्या मागे केवळ ४ जनांमध्येच हा रक्तगट आढळून येतो. त्यानंतर आता अलीकडच्याच काळात आणखी एका दुर्मिळ रक्तगटाची यात भर पडली आहे.
फक्त ९ लोक सध्या रक्तदाते :
नव्यानेच रक्तगटांत भर पडलेल्या या दुर्मिळ रक्तगटाला ‘RH नल किंवा ‘गोल्डन ब्लड या नावाने देखील ओळखले जाते. आणि महत्वाचं म्हणजे जगभरात आतापर्यंत केवळ ४३ जनांमध्येच हा दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. या रक्तगटाबाबत विशेष बाब म्हणजे हा रक्तगट असणारे लोक कोणताही दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांसाठी त्यांचे रक्त देऊ शकतात. मात्र त्यांना ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताची आवश्यकता भासेल तेव्हा त्यांना त्यांचा जो रक्तगट आहे त्याच रक्तगटाचे रक्त द्यावे लागते. आणि संपूर्ण जगभरात या रक्तगटाचे अवघे ९ लोकच रक्तदाते आहेत. परिस्थिती अत्यंत हलाखीची असेल आणि पूर्ण हाताबाहेर परिस्थिती गेली असल्यास या रक्तदात्यांना रक्तदान कारण्याची विनंती केली जात असते. रक्तदाते अगदी नगण्य म्हणजेच बोटावर मोजण्याइतकेच असल्याकारणाने हा रक्तगट असलेल्या लोकांना त्यांची स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना काही आजाराजाशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागले तर हव्या असलेल्या रक्तगटाच्या डोनर शोधणे खुप कठीण होऊन बसते.
हेही वाचा – शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले..
जगभरात फक्त ४३ लोकांचा हा रक्तगट
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे असे स्पष्ट होते की रक्तगट हा शरीरात असणाऱ्या लाल पेशींच्या वर असलेल्या अँटीजेनच्या काऊंटवरून ठरवलं जातो. आपल्या शरीरात असणाऱ्या लाल पेशींवर असणाऱ्या डोनटवर ते स्प्रिंकलप्रमाणे हे अँटीजेन काऊंट आढळून येतात. ज्या रक्तात D अँटीजेन आढळून येतात त्या रक्तगटाला RH पॉझटीव्ह असे म्हटले जाते. तर याच्या विरुद्ध म्हणजेच ज्या रक्तात हे अँटीजेन आढळत नाही त्या रक्तगटाला RH निगेटिव्ह असे म्हटले जाते. या रक्ताची विशेष गोष्ट म्हणजे यात ६१ प्रकारचे अँटीजेन आढळत नाहीत. कदाचित यामुळेच या रक्तगटाला दुर्मिळ समजले जाते. अँटीजेनचा विचार केला तर आपल्या प्रत्येक पेशीवर एकूण ३४२ प्रकारचे अँटीजेन आढळतात. आपण जर गेल्या ५२ वर्षांचा विचार केला तर आतापर्यंत या रक्तगटाचे जगभरात फक्त ४३ लोक आढळून आले आहेत.
१९६१ मध्ये आढळला रक्तगटाचा हा प्रकार
बायोमेडिकल रिसर्च पोर्टलच्या मोझॅकवर पेनी बेली यांनी लिहिलेला एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. यात त्यांनी असा उल्लेख केला होता की सर्वप्रथम १९६१ साली हा रक्तगट ओळखला गेला होता. ऑस्ट्रेलिया या देशात स्थित असलेल्या तेथील मूळ रहिवाशांमध्ये हा रक्तगट आढळून आला होता. तर जगभरात केवळ ४३ लोकच असे आहेत ज्यांच्यात हा रक्तगट आढळून आला आहे.