breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांत उच्चांकी वाढ; ३ हजार ९५३ नवे रुग्ण

नगर |

जिल्ह्यात आज, शुक्रवारी करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा उच्चांकी वाढ आढळली. आज ३ हजार ९५३ नवे रुग्ण आढळले तर ३ हजार १४८ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचार सुरू असलेल्या २८ रुग्णांचा मृत्यू झाला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ८०६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८५.५८ टक्के झाले आहे. आज रुग्णसंख्येत ३ हजार ९५३ ने वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या आता २३ हजार २४१ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे – नगर शहर ६६०, नगर तालुका ४०६, संगमनेर ३४९, श्रीगोंदे २९६, राहुरी २८५, राहता २८०, कोपरगाव २७०, पारनेर २२७, शेवगाव १९९, जामखेड १८०, श्रीरामपूर १७०, निवासी १५९, अकोले १५१, कर्जत ११०, भिंगार ७९, पाथर्डी ५८, जिल्ह्यबाहेरील ४१, लष्करी रुग्णालयातील २५ व राज्याबाहेरील ६.

  • आज करोनामुक्त झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे –

मनपा ६०८, अकोले १९७, जामखेड ६६, कर्जत ३३६, कोपरगाव १७८, नगर तालुका २१३, नेवासा १३८, पारनेर ४२, पाथर्डी १४१, राहाता ३०१, राहुरी १५५, संगमनेर २२४, शेवगाव १३८, श्रीगोंदा १२८, श्रीरामपूर १७३, भिंगार २५, मिलिटरी हॉस्पिटल १३, इतर जिल्ह्यतील ७० आणि इतर राज्यातील २.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button