किल्ले रायगडावर तुफान पाऊस, आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Raigad Rain | रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.
तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले. त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले. ते व्हायरल झाले आहे.
हेही वाचा – मुंबईच्या वरळीत ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी फरार, मिहीर शाह कोण आहे?
दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड पायरी मार्ग आजपासून 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगड जिल्हाधिकारी यांना प्रस्तावर सादर केला आहे. यानंतर महाड प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी महच्वाचा निर्णय घेतला आहे.
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून रोपवे ने किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.





