breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#Covid-19: साताऱ्यात पुन्हा बाधितांची उच्चांकी रुग्णवाढ

  • नवे २,४९३ रुग्ण, ३२ बाधितांचा मृत्यू

सातारा |

सातारा जिल्ह्यात काल गुरुवारी उच्चांकी २,२५६ रुग्ण निष्पन्न होताना ४२ बाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली होती. या रुग्णनिष्पन्नतेत आज २३७ रुग्णांची (१०.५० टक्के) आणखी भर पडली. नव्याने २,४९३ रुग्ण निष्पन्न होताना, ३२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या सलग झेपावत असल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासनावरील ताण वाढत आहे. जिल्ह्यात आजवर निष्पन्न झालेल्या १ लाख ३ हजार २८१ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण सातारा तालुक्यात निष्पन्न झाले असून, ही संख्या २३ हजार ६१७ आहे. तर, सातारा तालुक्यातच सर्वाधिक ७३३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दररोज झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या आणि करोनाबळींचा वाढता आकडा यामुळे सुज्ञ जनतेकडून वाढवण्यात आलेल्या टाळेबंदीचे समर्थन होत आहे. बिकट परिस्थिती ओढावल्याने यंत्रणेची धावाधाव सुरू आहे.

वाचा- धक्कादायक! स्वस्त धान्य दुकानामधून दारू विक्रीचा प्रकार उघड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button