Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

Malaria Vaccine : मलेरियावरील भारतीय लसीचा WHOच्या यादीत समावेश

Malaria Vaccine : भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मलेरिया रोगावरील भारतीय लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) यादीत सामील करण्यात आलं आहे. मलेरिया वॅक्सिनने जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध ७५ चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यानंतर डब्ल्यूएचओने या लसीचा यादीत समावेश केला आहे.

मलेरियावरील या भारतीय लसीचं नाव R21/Matrix-M असं आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी मिळून तयार केली आहे. भारताने ३० वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर मलेरियावरील ही लस विकसित केली आहे.

हेही वाचा  –  ‘सरकारला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर..’; बच्चू कडूंचा घरचा आहेर 

मलेरियावर स्वस्त आणि प्रभावी उपाय

R21/Matrix-M ही WHO च्या मलेरिया प्रीक्वालिफाइड यादीत सामील होणारी दुसरी आणि पहिली भारतीय लस आहे. याआधी गेल्या वर्षी एका लसीचा या यादीत समावेश करण्यात आला होता. पण, त्यानंतर भारताने R21/Matrix-M ची निर्मिती करत जगाला मलेरियावरील स्वस्त आणि प्रभावी उपाय उपलब्ध करुन दिला आहे.

WHOच्या यादीतील मलेरियावरील दुसरी लस

जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोंबर २०२३ मलेरिया रोगावरील R21/Matrix-M या दुसऱ्या लसीला मंजुरी दिली होती. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल, असं WHOने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button