फळांमधील संत्री आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी

मुंबई : निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. फळांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यासह तुमच्या त्वचेला देखील खूप फायदे होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्या फळांचा तुमच्या आरोग्यासह त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फळांमधील संत्री तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुम्हाला जर त्वचे संबंधित समस्या असल्या तर तुमच्यासाठी संत्र्याच्या साली खूप फायदेशीर ठरतील. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्याचा वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्यासोबतच तुम्हाला पिंपल्स किंवा पिग्मेंटेशनच्या समस्या असतील तर त्या दूर होतात.
तुमच्या त्वचेला निस्तेज आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेसाठी तुम्ही संत्र्याच्या सालीपासून स्क्रब बनवू शकता आणि त्याचा वापर तुमच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर करू शकता. या स्क्रबचा वापर केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला स्वच्छ थंड पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्ही घरच्या घरी संत्र्याच्या सालीपासून टोनर बनवू शकते. संत्र्याचा टोनर बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. या टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संत्र्याच्या सालीचा टोनर कसा बनवायचा?
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे पाणी घालून त्यात संत्र्याची साल मिक्स करा.
त्यानंतर त्या पाण्यामध्ये संत्र्याची साल चांगली उकळून घ्या.
ज्या वेळी पाण्याचा रंग नारंगी होतो आणि पाणी अर्ध होतो त्यानंतर गॅस बंद करा.
संत्र्याची साल गाळणीच्या मदतीनं गाळून त्यामध्ये 2-3 व्हिटॅमिन ई कॅपस्यूल आणि गुलाब पाणी मिक्स करा.
सर्व मिश्रण एकत्र एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि तुमच्या चेहऱ्यावर वापरा.
व्हिटॅमिन सी टोनर त्वचेच्या छिद्रांना निरोगी ठेवण्यास मदत करते. संत्र्याच्या सालीचा टोनर त्वचेला हायड्रेट करण्यास आणि त्यानंतर त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा उघडल्यानंतर छिद्र पूर्णपणे घट्ट होतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत आणि बारीक रेषा टाळायच्या असतील तर तुम्ही हे व्हिटॅमिन सी टोनर वापरू शकता. हे टोनर तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास आणि नंतर कोलेजन वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि त्वचेची चमक देखील वाढते. व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिडने समृद्ध असलेल्या या टोनरमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे मुरुमे आणि डाग टाळतात. याशिवाय, हे टोनर त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. म्हणून या टिप्स फॉलो करा आणि नंतर त्या तुमच्या त्वचेसाठी वापरा.