विराटचा स्वत:वरचा ताबा सुटला.
विकेटकीपर केएल राहुल यानेही जाकेरला स्टंपिंग करण्याची संधी सोडली.

दुबई : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसरा सामना हा दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिला सामना आहे. बांगलादेशने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशने 49.4 ओव्हरमध्ये तॉहिद हृदॉय याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑलआऊट 228 धावा केल्या. तॉहिदने सर्वाधिक 100 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित राणा याने 3 तर अक्षर पटेल याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
पहिल्या डावादरम्यान भारतीय खेळाडूंनी एकाच खेळाडूला 3 वेळा जीवनदान दिलं. मात्र विराट कोहली याने एकाच खेळाडूवर राग काढला. विराटच्या संतापल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात.
एकाच खेळाडूला 3 वेळा जीवनदान
टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी निराशाजनक फिल्डिंग केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी जाकेर अलीची कॅच सोडली. तसेच विकेटकीपर केएल राहुल यानेही जाकेरला स्टंपिंग करण्याची संधी सोडली. अशाप्रकारे जाकेरला एकूण 3 वेळा जीवनदान मिळालं. केएलने जाकेरला स्टंपिंग करण्याची संधी सोडल्याने विराटने संताप व्यक्त केला आणि पुटपटला. विराटने केएलला शिवी दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांना लोकप्रतिनिधी- प्रशासनाचा ‘विश्वास’
जाकेरला रोहितकडून नवव्या आणि हार्दिककडून 20 व्या ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. दोघांनीही सोपी कॅच सोडली. त्यानंतर बांगलादेशच्या डावातील 23 वी ओव्हर जडेजा टाकायला आला. जडेजाने टाकलेल्या पहिल्याच बॉलवर जाकेर अली फसला आणि क्रीझबाहेर आला. मात्र केएलने बॉल निट न पकडल्याने स्टंपिंग करण्याची संधी हुकली. विराटला हे काय पटलं नाही. आधीच रोहित आणि हार्दिककडून जाकेरला जीवनदान मिळालेलं. त्यात केएलने संधी सोडली. त्यामुळे विराटचा स्वत:वरचा ताबा सुटला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.