Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#Covid-19: तापकीरनगरमध्ये ओम साई ग्रुपच्यावतीने नागरिकांची ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’
पिंपरी |
१ मे महाराष्ट्र दिन दिनानिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई ग्रुप तापकीरनगर यांच्यावतीने जिजामाता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात १२५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कोरोनाची तपासणी करून घेतली.
यावेळी दुपारी २ वाजेपर्यंत १२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांचे जिजामाता हॉस्पिटल अंतर्गत उपचार चालू करण्यात आलेत. तसेच प्रत्येक तपासणी करणाऱ्या नागरिकाला ‘वाफेची मिशन’ संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या वतीने देण्यात आले.
वाचा – #Covid-19: औषध कंपन्यांकडून कृत्रिम टंचाई; मुसक्या आवळण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा





