Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

#CoronaVirus: लस उपलब्ध झाली तर प्राधान्यक्रम ठरवावा लागेल!

लस उपलब्ध झाली तर ती प्राधान्याने समाजातील कोणा-कोणाला दिली पाहिजे, याचा विचार आत्तापासून केला पाहिजे. लस म्हणजे एखादे बटण नव्हे की ती दाबले की ही लस लगेचच सर्वाना मिळेल. या लसीची प्रत्येकाला गरज लागणार आहे. त्यामुळे लसीची लोकांसाठी असलेली उपलब्धता हे देशासमोरील मोठे आव्हान असेल, असा मुद्दा विजय राघवन यांनी मांडला.

दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे करोनाविषाणूविरोधात प्रभावशाली औषध उपलब्ध करणे. एखादे औषध विषाणूविरोधात काम करत असले तरी त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात हे लक्षात घेऊन औषध शोधून काढावा लागेल. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (सीएसआयआर) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था (एआयसीटीई) हॅकेथॉनची सुरुवात केली असून विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशीही माहिती राघवन यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button