Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात बुधवारपासून होणार Oxfordच्या कोरोना लशीची मानवी चाचणी!
पुणे: सर्व जगाचं लक्ष लागलेल्या Oxford Universityच्या लशीच्या मानवी परीक्षणाला पुण्यात सुरुवात होणार आहे. बुधवारपासून (26 ऑगस्ट) ही चाचणी भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. मानवी चाचणीसाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने देशभरात निवडलेल्या 17 संस्थांमध्ये भारती विद्यापीठाचा देखील समावेश होतो आहे.
जगभरातले तज्ज्ञांचं लक्ष या चाचणीकडे लागलेलं असून ही दुसऱ्या टप्प्यातली चाचणी आहे. सुरुवातीला 5 जणांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या कोविड आणि इतर टेस्ट करण्यात येणार असून त्या निगेटिव्ह आल्या तरच त्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय लालवानी यांनी दिलेली आहे.





