breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मदत ३० सप्टेंबरला संपणार

२००० Rupees note : तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. जर तुम्ही २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नसतील तर हे काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे लागणार आहे.

तुम्हाला नोटा बदलाच्या असतील तर जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही नोटा बदलू शकता. मात्र एका दिवसात फक्त १० नोटा बदलता येतात. त्यामुळे आता नोटा बदलण्यासाठी फक्त चार दिवस बाकी आहेत. आरबीआयच्या मते आतापर्यंत २००० रुपयांच्या ९३ % नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत, म्हणजे फक्त ७% नोटा परत आल्या नाहीत.

हेही वाचा – मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश! २१ व्या दिवशी धनगर समाजाचं उपोषण मागे

२००० रुपयांच्या नोटा तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच हे नियम प्रत्येक बँकेनुसार वेगळे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button