breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

वो दौर कुछ और था ये दौर कुछ और है – जयंत पाटील

नागपूर – अनेक जण पक्ष सोडून गेले मात्र या गोष्टी मागे टाका, ‘वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है’ असे सांगत पक्षाचे बुथ संघटन अधिक मजबूत करा… जोमाने कामाला लागा… राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा… पवारसाहेबांच्या विचारांचा प्रसार करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीणचा आढावा घेताना केले.नेत्यांची खरी ताकद हे कार्यकर्ते असतात, आपल्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती, अनिलबाबूंचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षम उभे राहतात हे पाहून समाधान झाले अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचे कौतुक केले.

आगामी काळात नागपूर शहरात निवडणुका होणार आहेत. मागे पक्षाला पराभव पत्कारावा लागला आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना करुन दिली.नागपूर येथे राष्ट्रवादीचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगले कामेही करत आहोत त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठतोय. आपण विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button