ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महिला सबलीकरणासाठी महापालिकेचा विधायक ‘सिध्दी उपक्रम’

३०० महिला वाटणार मालमत्ता कराची बिले; महिलांना सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणासाठी अतिशय विधायक असे पाऊल उचलण्यात आले आहे. कर आकारणी व कर संकलन विभागातर्फे 2023-24 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले 300 महिलांच्या मार्फत वाटण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेने तयार केलेल्या ॲप्लिकेशनद्वारे मालमत्ता धारकांची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. या उपक्रमास ‘सिध्दी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी महिला बिले घेऊन आल्यानंतर त्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातर्फे करण्यात आले आहे.

शहरात पाच लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. गतवर्षी कर संकलन विभागाने महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच 817 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटींचा टप्पा गाठण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी वर्षभराचे सूक्ष्म नियोजन केले आहे. याच अनुषंगाने महापालिकेने प्रथमच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाच्या 300 महिलांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्यासाठी नियुक्त करण्याचा अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. यामधून महिलांना रोजगार आणि पैसेही मिळणार आहेत.

कर आकारणी व कर संकलन विभागाने पाच लाख 97 हजार 785 बिले छापली आहेत. आर्थिक विकास महामंडळाने निवड केलेल्या 300 महिलांमार्फत बिले वाटप करण्यात येणार आहेत. या महिलांना सोमवारी (दि. 24) महापालिकेत सहाय्यक प्रशासन अधिकारी, मंडलाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी महिलांना मालमत्ता कराच्या बिलाची, नागरिकांची काय माहित भरून घ्यायची आहे, यासाठी ॲप डाऊनलोड करून त्याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली. बिले वाटपात सुसुत्रता आणण्यासाठी योग्य नियोजन करून महिलांना ओळखपत्रेही देण्यात आली आहेत.

हे आहेत फायदे..

नागरिकांनी या माहितीची खातरजमा करावी..
1) नाव बरोबर आहे का?
2) मोबाईल क्रमांक बरोबर आहे का?
3) दुसरा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे का?
4) संपर्काचा वेगळा पत्ता द्यायचा आहे का?
मालमत्ता कराच्या बिलाचे वेगाने वाटप होण्यासह सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी ‘सिध्दी’ उपक्रम हाती घेतला आहे. बिलांचे वाटप झाल्यानंतर कर संकलनमध्ये भरीव वाढ होईल. महिला अतिशय उत्तम प्रकारे हा उपक्रम यशस्वी करतील, असा विश्वास असल्यानेच हे काम महिला बचत गटांना दिले आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना ओळखपत्र दिले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी महिलांचे ओळख पत्र आणि बिल पाहून सोसायटीत प्रवेश देऊन सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक

शहरातील मालमत्ता धारकांना घरपोच बिले जाणे, हे कर संकलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक नागरिक ऑनलाईन बिल अदा करत असले तरी त्यांना बिलाची प्रत मिळणे आवश्यक बाब आहे. तसेच कर संकलन विभागाकडे सद्यस्थितीत फक्त 35 टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे, या उदात्त हेतूने मालमत्ता कराची बिले वाटप करण्यासाठी महिला बचत गटांना हे काम देण्यात आले आहे.
– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button