breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#HeavyRain: मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, ताशी 70 किमी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार

मुंबई: मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेला 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हे वारे 6 ऑगस्टपर्यंत सुरु राहतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रात्रभर 70 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह उत्तर कोकणात आज रात्रभर मुसळधार पाऊस पडण्याशी शक्यता, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाकडून या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. काही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास 100 क्रमांकावर फोन करा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button