Uncategorized

ठाण्यात मुसळधार पावसाने वाहतूक कोंडी, शाळेची बस बिघडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना आता धुवांधार पावसाने शहरांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे अनेक उपनगरांमध्ये पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे रुळांवरदेखील पाणी साचलं आहे. याता थेट परिणाम चाकरमान्यांवर होत असून ठाण्यात आझाद नगर ते कोलशेत लिंक रोड दीड तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिटी फ्लोची बस बंद पडल्याने दीड किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक शाळकरी मुलं अडकली आहेत. या सगळ्या बाबत वाहतूक पोलीस मात्र अनभिज्ञ आहेत. यामुळे स्थानिकच वाहतूक नियोजन करत आहेत.

दरम्यान, मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये ‘परंपरेप्रमाणे’ पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असली तरी बच्चेकंपनीची मात्र मजा झाली आहे. कुर्ला भागातही अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, कुर्ल्यातील नेहरू नगरातील एस.के.पंतवाळवलकर इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरले. या शाळेच्या वर्गांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. मात्र, या सगळ्यामुळे मोठ्यांची मात्र गैरसोय होताना दिसत आहे.

पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकांत रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु आहे. तर अंधेरीतील मिलन सबवे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आहे. आणखी काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

मुंबई, कोकणात तुफान पाऊस

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button