Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, ११४ मिलीमीटर पावसाची नोंद

डोंबिवली : जुलैच्या सुरवातीपासून पावसाने चांगला धोर धरला असून पावसाने मागच्या महिन्यातील बॅकलॉग भरण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला असला तरी धरण क्षेत्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

संपूर्ण जून महिना घामाच्या धारा पुसण्यातच गेल्याने सर्वच जण पावसाची वाट पाहत होते.जून महिन्यात थोडे फार पावसाचे शिंतोडे पडले. परंतु त्याने वातावरणातील गर्मी कमी होण्याऐवजी त्यात आणखीनच वाढली परिणामी जुलै महिन्यात तरी पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. तर कालपासूनच कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे गेल्या वर्षीच्या पावसाची आकडेवारी पाहता हा पाऊस कमी असला तरी येत्या काळात ही तूट भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला असला तरी धरण क्षेत्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर असलेले आणि जिल्ह्याची तहाण भागवणारे बारवी धरण अवघे ३३ टक्के भरले आहे. धरणात अवघे ११५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ४० टक्क्यांवर होता. त्यामुळे धरणक्षेत्राला पावसाची प्रतिक्षाच आहे.

बारवी धरणात सध्याच्या घडीला अवघे ११५ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आहे. एकूण क्षमतेच्या हे पाणी अवघे ३३.९५ इतके आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ६१.२० टक्क्यावर आहे. गेल्या २४ तासात धरणात अवघा ५३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षात बारवी धरणात ४०.५५ टक्के इतके पाणी होते. त्यामुळे आतापर्यंत धरणात जमा झालेले पाणी समाधानकारक नसून येत्या महिनाभरात पुरेसा पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त होते आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी….

ठाणे – १३३ मिलीमीटर,

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४९६ मिलीमीटर)

कल्याण डोंबिवली – ११४ मिलीमीटर,

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३८३ मिलीमीटर)

मुरबाड – ३९ मिलीमीटर,

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस २९१ मिलीमीटर)

भिवंडी – ११५ मिलीमीटर,

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३९१ मिलीमीटर)

शहापूर – ६० मिलीमीटर,

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३७२ मिलीमीटर)

उल्हासनगर – ९६ मिलीमीटर

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४१२ मिलीमीटर )

अंबरनाथ – ९२ मिलीमीटर

(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४३८ मिलीमीटर )

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button