पिंपरी / चिंचवड

फोनवर बोलत असलेल्या तरुणीचा मोबाईल हिसकावला

पिंपरी l प्रतिनिधी

फोनवर बोलत असलेल्या तरुणीचा मोबाईल फोन एका चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता बा रा घोलप कॉलेज समोर सांगवी येथे घडली.

याप्रकरणी तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वा रा घोलप कॉलेज समोर फोनवर बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी चोरट्याने फिर्यादीचा 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button