पिंपरी / चिंचवड

डोक्यात बिअरची बाटली मारून दुकानाच्या गल्ल्यातून रोकड पळवली

पिंपरी l प्रतिनिधी

दुकानदाराच्या डोक्यात बिअरची बाटली मारून दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री दहा वाजता भोसरी येथे घडली.

चंद्रकांत शंकर पवार (वय 39, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत गायकवाड (रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे धावडेवस्ती येथे जनरल स्टोअर्स दुकान आहे. ते रविवारी रात्री त्यांच्या दुकानात असताना आरोपी तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना पवार यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. पवार यांना जखमी करून दुकानाच्या गल्ल्यातून सात हजार रुपये रोख रक्कम संकेत गायकवाड याने जबरदस्तीने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button