पिंपरी / चिंचवड

कारची काच फोडून चालकाला लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

कारची काच फोडून चार जणांनी चालकाच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी पिंपरी येथे घडली.

किशोर ज्ञानोबा रणपिसे (वय 38, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणपिसे हे पिंपरीतील रिव्हर रोडने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कारमधून जात होते. त्यावेळी चारजण अचानक त्यांच्या कारसमोर आले. त्यापैकी एकाने खिडकीतून आत हात घालत रणपिसे यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर रणपिसे यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबदरस्तीने काढून घेतले. त्यावेळी एकाने समोरील काचेवर दगड मारून कारची काच फोडली. आरोपींचा आरडा ओरडा ऐकून नागरिक जमू लागल्याने आरोपी बाजूच्या झोपडपट्टीत पळून गेले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button