breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोठी बातमी : पिंपरी- चिंचवडमधील माता रमाई स्मारकाच्या जागेचा तिढा अखेर सुटला!

  •  नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर यांच्यासह आंबेडकरी समाजाचा यशस्वी पाठपुरावा
  •  पीएमपीची जागा महापालिका प्रशासन अधिग्रहित करणार
  •  शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने महापौर माई ढोरे यांचा सत्कार

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्यामागे असलेली पीएमपीच्या ताब्यातील मोकळी जागा अधिग्रहीत करण्याची घोषणा महापौर माई ढोरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यासह आंबेडकरी समाजाच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाकड़े यशस्वी पाठपुरावा केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या जडण घडणीसाठी येथील प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्याचप्रमाणे पत्नी त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे कार्य महान असून त्यांच्या कार्यास साजेसे रचनात्मक तसेच दर्जेदार स्मारक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेत करण्यात येणार आहे.

माता रमाई यांचे स्मारक व्हावे यासाठी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले होते. या पाठपुराव्याला यश आले असून, महापौरांच्या या घोषणेनंतर धर यांनी आज महापौरांचा महापालिकेत सत्कार केला. पिंपरी येथील महापौर कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका सुलक्षणा धर, पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक सागर अंगोळकर, माधुरी राजापुरे यांच्यासह आंबेडकरी चळवळीत काम करणारे सर्वपक्षीय पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

  • समाजाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला!

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयामागील मोकळ्या जागेत त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. नियोजित स्मारकासाठी स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी शहरातील बौद्ध संघटनांनी महानगरपालिकेकडे केली होती. बौद्ध समाजातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी प्रशासनाला या बाबत निवेदने दिली होती. महापालिकेच्या सभागृहसमोर देखील या विषयाचे महत्त्व पटवून दिले होते. या नियोजित स्मारकाची माहिती तसेच आढावा घेण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर महानगरपालिकेत आले होते. त्यांच्यासमवेत नुकतीच महापालिका भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत भीमराव आंबेडकर यांनीदेखील स्वतंत्र स्मारक उभारण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. या सर्व बाबींवर विचार विनिमय करुन तसेच जनसामान्यांच्या भावना लक्षात घेता त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक स्वतंत्र जागेत उभारण्याचा निर्णय महापौर माई ढोरे यांनी घेतला आहे.

  • इतिहास नक्कीच भावी पिढीसाठी आदर्श: डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर

इतिहास हा नक्कीच भावी पिढीसाठी आदर्श असतो घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य उभ्या जगाला माहिती आहे. विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य स्मारक रूपात, ठेव्याच्या रूपात जतन करण्यात आले आहेत. मात्र, माता रमाई यांचे कार्यदेखील तितकेच मोठे असून हा ठेवा देखील भावी पिढी समोर येणे आवश्यक आहे म्हणूनच या विषयासाठी मी गेले अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. आता स्मारक प्रत्यक्षात उतरावे हाच एक मानस असल्याचे नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button