TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

आशिया चषकासाठी टीम इंडियाचा नवा लुक पाहिलात का? फोटोशूटची धम्माल झाली Viral

 आशिया चषक मालिकेतील बहुप्रतीक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान. यंदा २८ ऑगस्टला हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधलेले आहे. टीम इंडियाचे १५ सदस्य सध्या दुबईमध्ये सराव सत्रासाठी उपस्थित आहेत. आगामी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आपापल्या नवीन युनिफॉर्मसह खास फोटोशूट केले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा पहिला लुक पाहायला मिळत आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या नव्या जर्सीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार फोटोशूट करताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी खेळाडूंचे चेहरे नेहमीप्रमाणे हसरे खेळते व चिंतामुक्त होते. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याच्या आधी टीम इंडियाचे हे निवांत चेहरे खेळात काय कमाल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियाचा आशिया चषकसाठी नवा लुक

दरम्यान, यंदा रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा संघाचा भाग असणार आहे. यंदा टीम इंडियाने फलंदाज व गोलंदाज दोन्हीच्या निवडीत समसमान खेळाडूंना संधी दिलेली आहे. हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा या अष्टपैलु खेळाडूंमुळे भारताची बाजू जमेची आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह हा हुकुमी एक्का मात्र यंदा आशिया चषकमध्ये पाहायला मिळणार नाही.

आशिया चषकात आतापर्यंत भारत- विरुद्ध पाकिस्तान असे १४ सामने झाले असून यात आठ सामने भारताने तर ५ सामने पाकिस्तानने पटकावले होते. भारताने आजवर ७ वेळा तर पाकिस्तानने पाच वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. यंदा आशिया चषकात भारत आठव्यांदा चषक मायदेशी परत आणण्यासाठी सज्ज आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button