ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

दानवेंचा रुद्रावतार, बोनेटवरुन खाली उतरले, कार्यकर्त्यांना झापलं, पुन्हा बोनेटवरुन गाडीत

औरंगाबाद |केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या हटके स्टाईलसाठी आणि गावरान बोलीसाठी ओळखले जातात. ‘नाथसागराची खोली आणि दानवेंची बोली’ ही आधुनिक म्हणही मराठवाड्यात लोकप्रिय आहे. आज दानवेंच्या याच हटकेपणाचा अनुभव औरंगाबादकरांना आला. भाजपचा विराट जल आक्रोश मोर्चा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या सभेत रावसाहेब दानवेंचा रुद्रावतार मोर्चेकऱ्यांना अनुभवायला मिळाला. फडणवीसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी असल्याने त्यांची गाडी काही पुढे सरकत नव्हती. अखेर दानवे गाडीच्या बोनेटवरुन खाली उतरले. एका कार्यकर्त्याच्या हातून झेंडा घेतला. त्याच झेंड्याच्या काठीने कार्यकर्त्यांना बाजूला सारलं आणि फडणवीसांना ‘येऊ द्या गाडी पुढे’ असा इशारा केला. गाडी पुढे सरकताच ते पुन्हा गाडीच्या बोनेटवरुनच गाडीत जाऊन बसले. दानवेंचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

दानवेंचा रुद्रावतार

औरंगाबादमधल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आयोजित करण्यात रोड शो मध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांची गर्दी बरीच असल्याने थोड्या वेळासाठी फडणवीसांची गाडी एकाच जागेवर उभी राहिली. सभेची वेळ जवळ येत असल्याने फडणवीसांनी ‘पुढे चला’ म्हणत कार्यकर्त्यांना हाताने इशारे केले. पण कार्यकर्त्यांनी काही जागा सोडली नाही. शेवटी रावसाहेब दानवेंनी सूत्रे हातात घेतली.

अखेर रावसाहेब दानवे गाडीच्या बोनेटवरुन खाली उतरले. एका कार्यकर्त्याच्या हातून झेंडा घेतला. त्याच झेंड्याच्या काठीने कार्यकर्त्यांना बाजूला सारलं आणि फडणवीसांना ‘येऊ द्या गाडी पुढे’ असा इशारा केला. गाडी पुढे सरकताच ते पुन्हा गाडीच्या बोनेटवरुनच गाडीत जाऊन बसले. दानवेंचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दानवेंचा रुद्रावतार पाहून फडणवीसांनाही हसू आवरेना. त्यांनीही दानवेंच्या दोन मिनिटांच्या रुद्रावचाराला हसून दाद दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही दानवेंच्या हटकेपणाचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. एकंदरीत दानवेंनी आपल्या हटेकपणाचं दर्शन पुन्हा एकदा औरंगाबादकरांना दिलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button