breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ICC ची मोठी कारवाई! हरमनप्रीत कौरवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी

Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात केलेल्या गैरवर्तुणुकीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी दोन सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

हरमनप्रीतला भडकायला नेमकं काय झालं?

बांगलादेशने पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-१ ने बरोबर साधली. त्यामुळे तिसरी आणि अंतिम सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक होता. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघासमोर २२६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी सुरू होती. भारतीय संघाने दोन विकेट गमावल्या. त्यानंतर हर्लीन देओल आणि स्मृती मंधना या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांचटी भागीदारी केली. स्मृतीने ५९ धावा केल्या.

हेही वाचा – Kargil Vijay Diwas : जाणून घ्या कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम..

यानंतर हरमनप्रीत आणि हर्लीन या दोघांनी मोठ्या भागीदारीच्या दिशेने सुरूवात केली. नाहिदा अख्तर सामन्यातील ३४ वी ओव्हर टाकायला आली. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हरमनप्रीत झेलबाद झाल्याचा निर्णय अंपायरने दिला. अंपायरचा निर्णय हरमनप्रीतला पटला नाही. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर बॉल बॅटला न लागता पॅडला लागल्याचं समजलं. त्यामुळे हरमनप्रीतने स्पंपवर बॅट मारत राग व्यक्त केला. त्यानंतर हरमनप्रीत वर आयसीसीने कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button