breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराष्ट्रिय

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम..

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस म्हणून आज २६ जुलै रोजी हा दिवस भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटतो. कारगिल युद्धामधील भारतीय सैनिकांचे धैर्य आणि शौर्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानवर कसा विजय मिळवला जाणून घ्या थोडक्यात..

हेही वाचा – टोलनाक्याची तोडफोड केल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

१९९९ च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम…

  • ४ मे : कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.
  • ५ ते १५ मे : या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.
  • २६ मे : भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
  • २७ मे : भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
  • ३१ मे : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.
  • १० जुन : पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.
  • १३ जून : भारतीय सैन्याने द्रास परिसरातील तोलोलिंग परिसरावर कब्जा मिळवला.
  • १५ जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली
  • २९ जून : भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.
  • ४ जुलै : तब्बल ११ तासांच्या धुमश्चक्रीनंतर भारताने टायगर हिल्सवर पुन्हा कब्जा केला.
  • ५ जुलै : शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली.
  • ११ जुलै : पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
  • १४ जुलै : भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला.
  • २६ जुलै : कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button