breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

इतिहासाची मोडतोड करणारा “हर हर महादेव” पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाडला!

संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका : चुकीचा इतिहास रुजवण्याच्या प्रकाराला विरोध

पिंपरी : इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव” चित्रपट अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाडला. संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत पिंपरीतील विशाल ई-स्वेअर चित्रपटगृहात धडक दिली.
संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे म्हणाले की, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे. शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदल-देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहे. वारंवार मराठी-मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे.
तसेच, या चित्रपटात पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे. राष्ट्रमाता बाजीप्रभूचां सल्ला घेताना दाखवले आहे. छत्रपती होतील ना राजे ?? अफजलखान क्रूर आहे हे बाजीप्रभू सल्ला देताना दाखवले आहे. म्हणजे छत्रपती यांच्या प्रगल्भ विचारांची चेष्टा केली आहे. छत्रपती यांना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे.छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला.असं खोट दाखवले आहे. शिवा काशिदला बाजीप्रभूंनी शोधून आणले असं खोटं दाखवलं आहे. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले. त्यांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन मारले असं दाखवले आहे.
आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी द्यावे..
१) ट्रेलर मध्ये मराठी शब्दांचा वापर वारंवार घेण्यात आला, का मराठा साम्राज्य म्हणायची लाज वाटत होती का?..
२) हा चित्रपट कोणत्या साधनांवर अवलंबून प्रकाशित करण्यात आला आहे..?
३) संपूर्ण बारा मावळ मध्ये बाजी प्रभू देशपांडे हेच एकमेव लढावू होते का..?
४) बांदलांच्या कारभारात एक पाटील ६० मुली बाळींवर बलात्कार करतो आणि बांदल त्याला पाठीशी घालतात.. हे कुठल्या आधारे दाखवलं..?
५) छत्रपती शिवाजी महाराजांनी समेट करण्याच्या बाबतीत बांदलांशी केलेल्या पत्र व्यवहारात बाजीप्रभू देशपांडे यांच्या उल्लेख आढळतो का…?
६) चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभू व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाली होती..?
७) जेधे आणि बांदल घराण्याचे वैर होते पण,बकरी चोरण्यावरून बांदल जेधे एकमेकांची मुंडकी मारायचे..? इतक विकृत स्वरूप होत का…?
८) अफजल खानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू देशपांडे तिथं होते का..?
९) अफजल खान डावखुरा होता की उजवा होता हे शिवाजी महाराजांना खाजगीत सांगणारा बाजीप्रभू देशपांडे हा कुठल्या आधारे दाखवला..?
१०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा काही प्रोटोकॉल असतील.. हे सुद्धा सध्याच्या फालतू डायरेक्टर लोकांना कळत नसावे का..? उठसूठ कोणीही सरदार शिवाजी महाराजांना खाजगीत जाऊन काहीही सांगू शकत होते का..? हे कोणत्या आधारे दाखवता..?
११) छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचे वर्णन असताना सुद्धा, तुम्हाला पुचाट आणि पांचट, नकटा सुबोध भावेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भेटला का..?
१२) सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मात्र शुद्ध मराठी हे कोणत्या आधारावर..?
१३) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला…? ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि लॉजिकली चुकीच्या आहेत त्या तुम्ही धडाधड मोठ्या पडद्यावर दाखवता ? यातून तुम्हाला काय साध्य करायच आहे..?
१४) मराठी हा शब्द कुठल्या इतिहासाच्या साधनात सापडतो..?आणि असे बरेच काही प्रश्न…
त्यामुळे या चित्रपटाचा जाहीर निषेध. तात्काळ बंद करा.
याचबरोबर “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाची स्क्रिप्ट संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. अन्यथा संभाजी ब्रिगेड हा चित्रपट चालू देणार नाही. असा इशाराही सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button