breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांचा राष्ट्रवादीला पहिला ‘झटका’

आमदार अशोक पवारांची उडवली धांदल : जिजामाता बँकेच्या निवडणुकीत दमदार विजय

पुणे : राजकीय सूडभावनेतून जेलवारीला सामोरे जावे लागल्यामुळे पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात थेटपणे आघाडी उघडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ करणाऱ्या बांधलांनी अखेर जिजामाता बँकेच्या निवडणुकीत ‘शिकार’ केली. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी पुरस्कृत केलेल्या पॅनेलचा दारुन पराभव झाला.

राष्ट्रवादीविरोधात दंड थोपाटून मैदानात उतरलेल्या मंगलदास बांधलांनी राष्ट्रवादीला शिरुरमध्ये पहिला झटका दिला. त्यामुळे आगामी काळात शिरुर, हवेली आणि परिसरात मंगलदास बांधल ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहतील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत मंगलदास बांदल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. जिजामाता बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बांदल यांनी निवडणूक लढवणार म्हणून ते सर्व ताकदीनिशी निवडणूक उतरले होते. यावेळी त्यांच्यासमवेत बाजार समितीचे संचालक व आमदार अशोक पवार यांचे समर्थक आबाराजे मांढरे हे बांदल यांना साथ देत निवडणुकीत उतरले होते.
दुसरीकडे, भाजपाचे कट्टर असलेले व आमदार अशोक पवार यांचे विरोधक काकासाहेब खळदकर यांनी पवार यांच्या हातात हात देत निवडणुकीत पत्नीची उमेदवारी जाहीर केली. यामुळे सगळीकडे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. यामुळे राजकीय गणिते पक्षाच्या पलीकडे गेली. ही गणिते दररोज बदलत असताना जोरदार प्रचार दोन्ही बाजूने करण्यात आला. मांडवगण फराटा, शिक्रापूर अन् शिरूर परिसरात जास्त मतदान असल्याने निर्णायक बदल घडून येण्याची अपेक्षा होती.त्यानुसार बांदल यांनी एकहाती वर्चस्व निर्माण करत सर्व उमेदवारांना निवडून आणले. तालुक्यात सध्या बांदल यांच्या या निवडणुकीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
बांदलांचा प्रतिशोध भाजपाच्या पथ्यावर…

कुरघोडीच्या राजकारणामुळे मंगलदास बांदल यांना जेलची हवा खावी लागली. त्यासह कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये मन:स्ताप सहन करावा लागला. आता बांदल जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. मात्र, सामाजिक आणि राजकीय जीवनात संघर्ष आणि मानहानी होण्यास कारणीभूत ठरलेल्यांना व्याजासह परतफेड करणार… अशी भीष्मप्रतिज्ञा मंगलदास बांदल यांनी केली आहे. त्यांचा प्रतिशोध म्हणजे राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरत आहे. कारण, बांदल तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्यांनी थेटपणे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणी निर्माण होतील, अशी भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या तडाखेबाज भाषणांचा रोख राष्ट्रवादीच्या विरोधाचाच ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बांदल भाजपासाठी हिताचे ठरणार आहेत, असे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button