ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

ग्राऊंड रिपोर्ट: आमदारांचा वाढदिवस; राष्ट्रवादीला इशारा!

ना नेता, ना प्रोटोकॉल : शहर राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा चर्चेत

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस पिंपरी मतदार संघात विविध उपक्रमांनी साजरा झाला. मात्र, राष्ट्रवादीत सुरू असलेल्या प्रदेश पातळीवर घडामोडी आणि गेल्या काही महिन्यांपासून आमदार बनसोडे यांची संभ्रमात टाकणारी राजकीय भूमिका… अशा कारणांमुळे पार्टीस्तरावर कोणतेही ‘सेलिब्रेशन’ पहायला मिळाले नाही.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नाममात्र शुभेच्छा भेट घेतली. मात्र, शहरात कुठेही पक्षाचे बॅनर दिसले नाही किंवा जाहिरात करण्यात आली नाही. एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस साजरा होत असताना पार्टीकडून एखादा उपक्रम राबवला जातो. मात्र, तसे चित्र दिसले नाही. त्यामुळे आमदार अण्णा बनसाडे म्हणजे शहर राष्ट्रवादीतील दुर्लक्षित नेता आहे का? असा प्रश्न बनसोडे समर्थकांमधून उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, आमदार बनसोडे यांच्या समर्थकांनी स्वत: मतदार संघासह शहरातील काही ठिकाणी वाढदिवस अभिष्ठचिंतनाचे फलक लावले आहेत. काही समर्थकांनी समाजिक उपक्रमही घेतले आहेत. मात्र, त्यावर पक्षाच्या प्रदेश किंवा स्थानिक कोणत्याही नेत्याचा फोटो ‘प्रोटोकॉल’नुसार दिसत नाही.

वास्तविक, आमदार बनसोडे यांनी पार्टीचा प्रोटोकाल कधिच जुमानला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यावेळी बनसोडे अजितदादांच्या समर्थनार्थ उतरले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाले. भाजपासोबत जाण्याबाबत चर्चा सुरू झाली. त्यावेळीसुद्धा बनसोडे यांनी ‘‘अजित पवार हाच माझा पक्ष’’ अशी भूमिका घेत राज्यात लक्ष वेधले होते. त्यामुळे अण्णा बनसोडे हेसुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. हा शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा समजला जात आहे.


अतिमहत्त्वाकांक्षा लोकांमुळे बनसोडे संघटनेवर नाराज?
राष्ट्रवादीतील स्थानिक कुरघोडीच्या राजकारणामुळे आमदार बनसोडे काहीसे नाराज आहेत. त्यामुळे अजित पवार म्हणतील तसे, आपल्याला खालच्या लोकांचे देणे-घेणे नाही, अशी ठाम भूमिका त्यांच्या कृतितून दिसते. दुसरीकडे, शहरातील विद्यमान पदाधिकारी भाजपातील काही नाराज आणि अतिमहत्त्वाकांक्षी लोकांच्या मदतीने बनसोडे यांना ‘साईडट्राईक’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षात ज्येष्ठ असतानाही कार्यक्रम, सभा, संमेलनामध्ये मान-सन्मान मिळत नाही, असेही बनसोडे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले बनसोडे संघटनेवर मात्र कमालीचे नाराज आहेत, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button