breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किल्ले रायगडावर १६ जानेवारीला छत्रत्रपती संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा

रायगड : धर्मवीर छत्रत्रपती संभाजी महाराजांचा किल्ले रायगडावर १६ जानेवारी रोजी होणार भव्य राज्याभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर संपन्न होत आहे. या सोहळ्यास लाखो शिवशंभू भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतिने करण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर धर्मवीर शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती, रायगडच्या वतीने मागील नऊ वर्षांपासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो. या वर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते यंदाचा राजाभिषेक संपन्न होणार आहे.

जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतीविषयी धोरण अवलंबिले दुष्काळी परिस्थितीत रयतेस जो आधार दिला, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास ही धक्का लागता कामा नये, मुलुखगीरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हाच शिरस्ता छत्रपती संभाजमहाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी त्यात काळानुसार बदल करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जे योगदान दिले त्याच शेतकऱ्याच्या पोशिंदा राजाच्या हस्तेच या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा – अवधूत गुप्तेच्या संगीत रजनीला पिंपरी – चिंचवडकरांचा तूफान प्रतिसाद

१५ जानेवारी

रात्री ८ वा. पोवाड्याचा कार्यक्रम, राजसदर.

रात्री १० वा. गडदेवता आई शिरकाई देवीचा जागरण गोंधळ, होळीचा माळ, शिवस्मारक.

१६ जानेवारी

सकाळी ७ वा. राजमाता जिजाऊ समाधी पूजन, पाचाड.

सकाळी ८ वा. युवराज बिरूदे, राजचिन्हे व छत्रचामरे थोरल्या महाराजांकडून स्वीकारून छत्रपती होण्यासाठी आशीर्वाद व आदेश घेतील, शिवसमाधी.

सकाळी ९.१५ वा. रयतेचे लाडके धनी साअलंकृत पालखीतून रयतेचे अदबमुजरे स्वीकारत ढोल-ताशांच्या गजरात नगारखान्याकडे मार्गस्त होतील, बाजारपेठ.

सकाळी ९.१५ वा. शिरकाई देवीचे सुवासिनींकडून ओटीभरण कुंकुम करंडा राजधानीची गडदेवता शिरकाई देवीला आवताण, शिरकाई देवी मंदिर.

सकाळी ९.४५ वा. अवघ्या दुर्गात दुर्गपुरूष अशा रायगडाच्या गडपुरूषाचे पूजन, शिरकाई देवीचा जुना चौथरा.

सकाळी १० वा. धाकले धनी राज्याभिषेक पूर्वी थोरल्या महाराजसाहेबांचा अल्काब होईल, होळीचा माळ शिवस्मारक.

सकाळी १०.१५ वा. स्वराज्याची अस्मिता असणारा स्वराज्याच्या जरीपटक्याचे ध्वजपूजन व ध्वजारोहण, ध्वजस्तंभ नगारखाना.

सकाळी ११.१५ वा. नगारखान्यात धाकल्या धन्याचे सुवासिनींकडून शंभूछपतींचे औक्षण होईल.

सकाळी ११.२५ वा. शंभूछत्रपतींच्या अल्काबाच्या गगनभेदी ध्वनीच्या गजरात महाराज छत्रपती होण्यास सदरेकडे मार्गस्थ होतील.

सकाळी ११.३० वा. रयतेच्या अश्रू, घाम आणि रक्ताने घडवलेल्या, महाराजांनी आपल्या परिसस्पर्शाने पवित्र केलेल्या अवघ्या हिंदुस्थानाला धडकी भरवणाऱ्या राजसदरेवर स्वराज्याचे कवचकुंडल राजश्री शंभूछत्रपती पवित्र नद्यांच्या जळाने अभिषीक्त ‘छत्रपती’ होणार..

सकाळी १२ वा. साखऱ्या वाटप करून सोहळ्याची सांगता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button