breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेत काळ्या फिती लावून विमा पॉलिसीचा केला निषेध

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने वरदायिनी असलेली धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून त्याऐवजी खाजगी विमा पॉलिसी लागू करण्याचा एकतर्फी निर्णय कर्मचारी महासंघाला विश्वासात न घेता प्रशासनाने घेतला आहे. त्यास कर्मचारी महासंघाचा विरोध कायम असल्याचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर किसनराव चिंचवडे यांनी जाहीर केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय, सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच पीएमपीएमएलच्या निगडी डेपो, भोसरी डेपो व पिंपरी डेपो  यांच्या प्रवेशद्वारात कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व प्रभाग कमिटी यांच्यातर्फे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्याच सोबत या सणासुदीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून धन्वंतरी बंद करू पाहणाऱ्या प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन केले.

त्यास सर्व अधिकारी कर्मचारी वर्गातून भरघोस प्रतिसाद मिळाला व महापालिका सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य प्रशासकीय इमारत या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून काम केले.यामध्ये कर्मचारी महासंघाच्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button