breaking-newsराष्ट्रिय

कैराना पोटनिवडणुकासाठी अभुतपुर्व सुरक्षा

मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कैराना लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाने अभुतपुर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात केला असून तेथे निमलष्करी दलाच्या तब्बल 25 कंपन्या बंदोबस्ताच्या कामी तैनात करण्यात आल्या आहेत. या मतदार संघातील बहुतांश भाग हा शामली जिल्ह्यात येतो. या जिल्ह्याचे जिल्हधिकारी विक्रमसिंग यांनी सांगितले की मतदार संघाच्या सीमा भागातील सर्व चेकपोस्टवर पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक काळात बाहेरून येणाऱ्या समाजकंटकांना आळा घातला जात आहे.

या मतदार संघाचा जो भाग हरियानाच्या सीमेला लागून आहे तेथेही विशेष दक्षता घेतली जात आहे असे ते म्हणाले. सीमा भागातील 20 गावांच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात आहे. हा मतदार संघ जातीय चकमकींसाठी ओळखला जातो. या मतदार संघातील भाजपचे खासदार हुकुमसिंह यांच्या निधनाने तेथे ही पोटनिवडणूक होत असून त्यासाठी भाजपने दिवंगत हुकुमसिंह यांची कन्य मृगांका सिंह यांना तेथे उमेदवारी दिली आहे.

विरोधकांनी राष्ट्रीय लोकदलाच्या तब्बसुम हसन यांना एकमुखी पाठींबा दिला आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button