ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रक्षा बंधन स्पेशल : महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारे ‘घे भरारी’चे भव्य ३ दिवसीय प्रदर्शन चिंचवडमध्ये!

महिला उद्योजिकांना आणि नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन

पिंपरी : महिला उद्योजिकांना आणि नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘घे भरारी’ ने एक भव्य प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केले आहे. रक्षाबंधन स्पेशल हे प्रदर्शन दि. २५, २६ आणि २७ ॲागस्ट दरम्यान हे प्रदर्शन सिजन बॅक्वेट हॅाल, मुंबई पुणे हायवे, काळभोरनगर, चिंचवड येथे होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आयोजक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.

छोट्या व्यवसायिकाना एक व्यासपीठ मिळावे यासाठी ‘घे भरारी’ हा ग्रुप प्रयत्नशील असतो. फेसबुक वरुन अनेक छोटे व्यावसायिक यात सामील झाले आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने पुणे आणि देशभरातील लोक याला जोडले गेले आहेत.

हेही वाचा – भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? अजित पवार म्हणाले,..

ह्या प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे. उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफुम्स, कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कलाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू ,पिशव्या, टेराकोटा वस्तू ,खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे चमचमीत पदार्थाची मेजवानी येथे असणार आहे. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांना ह्या प्रदर्शनाला जरुर भेट द्यावी.

त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या घे भरारीच्या साथीने झालेला प्रवास आपल्याला बघायला मिळेल. या सर्व छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी. व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी तयार केलेल्या या सोहळ्याला जरूर उपस्थित राहून आपल्यामधील व्यावसायिक तयार करण्याच्या ह्या कामात नक्की सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button