breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनसेचे नवे रॅपसाँग ‘अपना टाईम आएगा’!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा वापर प्रभावी पद्धतीने होत असताना मनसेचे ‘अपना टाईम आएगा’ असे हटक्या पद्धतीचे रॅपसाँग प्रचंड व्हायरल होत आहे.

 

 

या रॅपसाँगद्वारे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका करण्यात आली असून गेल्या पाच वर्षात या सरकारने जी आश्वासने दिली त्यांचे काय झाले? त्यांच्या घोषणा केवळ चुनावी जुमले असल्याची टीका करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणूकीत ‘इसको वोट मत दो, तो अपना टाईम आएगा’ असे म्हणत मनसेची भाजप विरोधी भूमिका मांडण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र ‘यंदाची निवडणूक ही मोदी विरुद्ध देश आहे’ असे म्हणत ‘भाजप विरोधी प्रचाराला लागा’ असे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. यानंतर भाषणाद्वारे, सोशल मीडियाद्वारे मनसे-भाजपाची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

काय आहे रॅपसाँगमध्ये ?
सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख जमा होतील, वर्षात २ कोटी नवीन रोजगार उत्पन्न होतील, शेतक-यांची कर्जमाफी होईल, शहरांना स्मार्ट सिटी केले जाईल अशा भाजपाद्वारे केलेल्या घोषणा, हे चुनावी जुमले असल्याची टीका या रॅपसाँगमध्ये करण्यात आली आहे. काळा पैसा, अदानी, अंबानी, कर्जबुडवे विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी, नीरव मोदी अशा अनेक मुद्यांचा या रॅपसाँगमध्ये समावेश आहे. ‘चौकीदार चोर है’ म्हणत भाजपाद्वारे करण्यात आलेल्या घोषणा या केवळ धूळफेक असून त्यांच्या या घोषणांना सर्वसामान्य फसले असल्याची टीका करण्यात आली आहे. ‘इसको वोट मत देदो, तोही अपना टाईम आऐगा…’ असे म्हणत यंदाच्या निवडणूकीत भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असा मनसेचा सूर या रॅपसाँगद्वारे मांडण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button