breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिराळा औद्योगिक वसाहतसह इतर गावातील नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी-सत्यजित देशमुख

शिराळा / प्रतिनिधी
विनायक नायकवडी

शिराळा औद्योगिक वसाहतसह, भटवाडी, करमाळे, पाचुंब्री,पणुब्रे तर्फे शिराळा, घागरेवाडी, शिरशी, धामवडे, गिरजवडे यासह ज्या ठिकाणी वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी. तसेच महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेला प्रस्ताव शासनाकडे पाठवा. असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी सांगितले.
शिराळा औद्योगिक वसाहत सह नुकसान झालेल्या ठिकाणी सत्यजित देशमुख यांनी भेटीवेळी त्यांनी प्रशासकीय अधिकारी यांना सांगितले.

सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा ओद्योगिक वसाहत सह तालुक्याच्या उत्तर भागात झालेले वादळ व पाऊस प्रचड होता. लोकांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत मधील उदयोग, व्यवसाय, राहत्या घराचे कैले, पत्रे उठून गेली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जनावराच्या वस्त्यांचे, पेरणी झालेल्या या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. शेताचे बाध फुटून बियाणे वाहून गेले आहे.
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.त्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळेल त्यांना आता आधाराची आवश्यकता आहे.

महसूल विभाग तसेच वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने दुरुस्ती करून वीज उपलब्ध करून देण्यात येईल असे वीज वितरण अधिकाऱ्यानी सांगितले. नागरिकावर जे संकट आले आहे त्याला धीराने सामोरे जावून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे देशमुख यांनी सांगितले.

यावेळी माणिक पाटील,हंबीरराव देशमुख, संभाजी यादव, संभाजी पाटील, अमोल आढाव, शिवाजी पाटील, मारुती पाटील, पिनू पाटील, विश्वास फडतरे, भाऊसो चव्हाण, सतिश चव्हाण, रणजित चव्हाण, युवराज चव्हाण, सुनिल चव्हाण, भगवान चव्हाण, प्रकाश चव्हाण, विकास पाटिल, संदिप दिंडे, शरद चव्हाण,सुभाष चव्हाण यांच्यासह औद्योगिक वसाहत मधील उद्योजक, महसूल विभाग, वीज वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button