breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिराळ्यात ढगफुटीसदृश्य वादळी पाऊस घरांचे पत्रे उडाले, भिंतीही कोसळल्या

सांगली – मागील तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे .मात्र काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक कंपन्यांच्या इमारतींसह घरांचे पत्रे उडाले. काही इमारती भिंती पडल्याने जमीनदोस्त झाल्या.या वादळी पावसात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

काल दुपारी २ वाजल्यापासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. ठीक ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा व पावसाची तीव्रता इतकी जास्त होती की शिराळा एमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडून जायला सुरुवात झाली. पत्रे उडाल्याने आणि झाडांची पडझड झाल्याने इमारतींसह वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यात मर्यादित कर्मचारी उपस्थित असल्याने मोठी जीवितहानी टळली. उडून गेलेले पत्रे व पडलेले इमारतीचे काही भाग पाहिले असता या ढगफुटीची आणि वादळाची तीव्रता लक्षात येत होती. या वादळी पावसात शिराळा एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या दोन महिला व चार पुरुष असे सहा जण जखमी झाले आहेत. वादळी पावसानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर कंपन्यांचे मालक, व्यवस्थापकांनी एमआयडीसीमध्ये धाव घेत किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button