breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Google ने प्ले स्टोअरवरून Paytm अ‍ॅपला हटवल्यामुळे खळबळ; मात्र “आम्ही पुन्हा येणार”! म्हणत Paytm ची घोषणा

Google ने प्ले स्टोअरवरून Paytm अ‍ॅप अचानक हटवल्यामुळे खळबळ उडाली आहे . यामुळे डिजिटल भारताचा मोठा आधार असलेल्या पेटीएमला जोरदार धक्का बसला आहे. याचबरोबर करोडो युजरना पैशांचे काय होणार? पेटीएम बँक, पेटीएम वॉलेटवर असलेल्या पैशांचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. यावर कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

गुगलने म्हटल्यानुसार ”आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. या ऍपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात आहे” असं गुगलने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. पेटीएम हे अ‍ॅप जरी हटविण्यात आले असले तरीही पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिजनेस, पेटीएम मनी अ‍ॅप आताही प्ले स्टोअरवर आहेत. तसेच अ‍ॅपल स्टोअरवरून पेटीएम डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे चिंता केवळ अँड्रॉईड धारकांसाठीच आहे.

यावर पेटीएम कंपनीने खुलासा केला असून आम्ही पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. ”काही काळासाठी Paytm Android app हे Google’s Play Store वरून डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार नाही. ते लवकरच पुन्हा उपलब्ध होईल, असे म्हटले आहे. तसेच तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता”, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.


Google ने पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवण्याची कल्पना वारंवार डेव्हलपरला दिली होती. प्ले स्टोअरवर अ‍ॅप परत मिळविण्यासाठी पेटीएमच्या संपर्कात असल्याचंही गुगलनं सांगितलं आहे. पेटीएमची मालकी One97 Communications Limited या भारतीय कंपनीकडे आहे, त्याची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती, पण चीनच्या अलिबाबा समूहाशी पेटीएमनं भागीदारी केली होती, त्यामुळे पेटीएमला फिन्टेक कंपनी अँड फायनान्शिएल्सकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button