Uncategorized

खुशखबर! नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले

https://mahaenews.com/good-news-tuljabhavani-temple-is-open-for-22-hours-on-the-occasion-of-navratri/

तुळजापूर । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाई आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. घटस्थापनेच्या आधी ही सर्व काम पूर्ण केली जाणार आहेत. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यातील सर्व सण उत्सव निर्बंधांविना साजरे होत आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व मंदिरांत आता भाविकांना निर्बंधांशिवाय दर्शन घेता येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी एक आनंदाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी हे भाविकांसाठी आता 22 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत देवीचे दर्शन घेतला येणार आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे ओळखे जाते. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार आहे. नवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 1 वाजता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असून ते रात्री 11 वाजपर्यंत म्हणजे 22 तास खुले राहणर आहे. गेली दोन वर्ष राज्यात कोरोनाचे सावट होते त्यामुळे भाविकांसाठी मंदिरातील दर्शनावर पूर्णपणे बंदी होती, मात्र यंदा दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच भाविकांना मंदिरात कोणत्याही निर्बंधांशिवाय मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

26 सप्टेंबर 2022 पासून भारतात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यादिवशी पहाटे तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठापना होत दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना होते. घटस्थापना होत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात असंख्या भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात रंगरंगोटी, साफसफाई आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. घटस्थापनेच्या आधी ही सर्व काम पूर्ण केली जाणार आहेत. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा असे 15 दिवस हा महोत्सव सुरु असतो. यावेळी दररोज सरासरी दोन लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असतो. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी केली जाते.
यात पहिल्यांदच भाविकांच्या वतीने सिंहासनाचे पॉलिशींग केले जात आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु असल्याने सिंहासन रिकामं आहे. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या चांदीच्या सिंहासनाला पॉलिश करण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button