breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आनंदवार्ताः १५ दिवसांत निघणार आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

नागपूरः आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात निघेल व त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधानपरिषदेत सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे व उप केंद्रे येथील रिक्त पदांचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना मंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, शिक्षण व आरोग्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासन शिक्षण व आरोग्यासाठी अधिकाधिक निधीची तरतुद करणार आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रथम श्रेणी अधिकारी, क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत त्याची जाहिरात काढली जाईल. त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

सोलापूर जिल्हात ७७ आरोग्य केंद्रे आहेत. उप केंद्रांचे काम सुरु आहे. तेथील पद निर्मिती झाली आहे. पण सेवार्थ नोंद झालेली नाही. तसेच कर्माळा येथील उप केंद्र तयार आहे. तेथे पद निर्मिती झालेली नाही, असा मुद्दा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील अनेक सरकारी रुग्णवाहिकांची दुरवस्था झाली आहे. रुग्णांना घेऊन जाताना त्रास होत आहे. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार का?. तसेच सोलापूर जिल्ह्यात औषध खरेदीसाठी ८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यातील केवळ अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत, याकडेही आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष वेधले.

त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनीही प्रश्न विचारले. ते म्हणाले, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र ही जिल्हा रुग्णालयासारखी मोठी झालेली आहेत. तेथे डाॅक्टर राहायला असतात. या आरोग्य केंद्रांसाठी पाच ते दहा कोटींचे प्रस्ताव आलेले असतात. तेथील पदे रिक्त राहिली तर त्या केंद्रांचा गरिबांना उपयोग होत नाही. त्यामुळे यासाठी राज्य शासनाकडे निधी आहे का? केंद्र शासनाने यासाठी मदत केली आहे का? तसेच येथे पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे का?, असा सवाल आमदार शिंदे यांनी केला. त्याचे उत्तर देताना आरोग्य तानाजी सावंत यांनी वरील माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button