breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरेंना धक्का, काल मुख्यमंत्री बोलले आणि आज कारवाई

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड घोटाळ्याप्रकरणी एफआयआर

मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. बीएमसीच्या कोविड घोटाळ्यात सुजित पाटकर यांच्या अटकेनंतर आता थेट मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत कोविड घोटाळ्याबाबत इशारा देत कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आज याप्रकरणी माजी महापौरांवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. कोविड घोटाळा आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर असताना हा घोटाळा झाला होता. कोरोना संसर्गाच्या काळात कोविडच्या उपचारासाठी औषधे खरेदी करण्यात आली होती परंतु ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली. बॉडी बॅग खरेदीतही घोटाळा झाला होता. किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2000 बॉडी बॅग 6 हजार 800 रु
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2,000 रुपये किमतीची बॉडी बॅग 6,800 रुपयांना खरेदी करण्यात आली. हे कंत्राट देताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. विरोधाला न जुमानता हे कंत्राट देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासानंतर आजच आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी मी ईडीच्या रडारवर नसल्याचे सांगितले होते.

त्यांना सोडणार नाही…
दरम्यान, कोविड घोटाळ्याचा मुद्दाही विधानसभेत गाजला. 4 ते 500 रुपयांची बॉडी बॅग 6 हजार रुपयांना विकत घेतल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही कोविडमध्ये काम करत होतो, लोक मदत करत होते. त्यावेळी लोक कोविडने मरत होते आणि काही लोक पैसे कमवत होते, हे दुर्दैव आहे. यातील घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. लाईफ लाईन हॉस्पिटल किंवा डेड लाईन हॉस्पिटल. या दवाखान्यात लोक मरत होते, त्यांनी आपल्याच लोकांना कंत्राट दिले.

अनुभव नसलेल्या लोकांना काम दिले. त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते. मात्र रुग्णालयात डॉक्टर असल्याचे सांगून पैसे उकळले. काल विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केला. आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button