breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

गुड न्यूज! भंडारा जिल्हा कोरोनामुक्त म्हणून घोषित

भंडारा – कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी गुड न्यूज मिळाली आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोनामुक्त म्हणून घोषित झाला आहे. तेथे उपचार घेत असलेला शेवटचा रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त होऊन घरी गेला. त्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली.

भंडारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच कोरोनाचा रुग्ण उरला होता. तो शुक्रवारी कोरोनावर मात करून घरी परतला. शुक्रवारी जिल्ह्यात एका दिवसात ५७८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र त्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे आणि जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शून्य झाल्याचे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. प्रशासन आणि नागरिक यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फळ आहे, असे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. आर. एस. फारूकी यांनी सांगितले. मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर आम्ही कोरोनावर मात केली असल्याचे ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजार ८०९ असून १,१३३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button