breaking-newsटेक -तंत्र

127.6 मिलियन डाऊनलोडसह भारताचं ‘आरोग्य सेतु’ ऍप कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप बनलं

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी तयार केलेल्या ‘आरोग्य सेतु’ ऍपच्या नावावर आणखी एक कामगिरी नोंदवण्यात आली आहे. ‘आरोग्य सेतु’ जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेलं कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप बनलं आहे.

सेन्सर टॉवर स्टोअर इंटेलिजेंसच्या नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ,मार्च 2020 पासून, 13 देशांतील 173 मिलियन लोकांनी विविध कोविड-19 कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप्स डाउनलोड केले आहेत. आणि 127.6 मिलियन डाऊनलोडसह भारताचं ‘आरोग्य सेतु’ ऍप या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

‘आरोग्य सेतु’ ऍपनंतर 11.1 मिलियन डाऊनलोडसह तुर्कीचं ‘हयात ईव सियार’ हे ऍप दुसऱ्या क्रमांकावर आह आहे. तर 10.4 मिलियन डाऊनलोडसह जर्मनीचं ‘कोरोना-वॉर्न-ऍप’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 20 मिलियन किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या 13 देशांमधील सरकार-समर्थित कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग ऍप्सवर हा अभ्यास केला गेला. त्यात ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, पेरू, फिलीपिन्स, सौदी अरेबिया, थायलंड, तुर्की आणि व्हिएतनाम यांचा समावेश होता.

अंदाजे 13 बिलियन लोकांची एकत्रित लोकसंख्या असलेल्या, या 13 देशांमधील एकूण 173 दशलक्ष लोकांनी सरकार-समर्थित कॉन्टेक्ट-ट्रेसिंग ऍप्स डाऊनलोड केले. लोकसंख्येच्या बाबतीत 4.5 मिलियन यूनिक इनस्टॉलसह ऑस्ट्रेलियाच्या COVIDSafe ऍपचा एडॉप्शन रेट सर्वाधिक होता. एडॉप्शन रेटमध्ये भारत (12.5%) चौथ्या क्रमांकावर होता. भारताच्या ‘आरोग्य सेतु’ ऍपच्या डाऊनलोडचं प्रमाण एप्रिलमध्ये वाढलं आणि ऍप स्टोर आणि गूगल प्लेद्वारे जवळपास 80.8 मिलियन डाऊनलोड झाले.

‘आरोग्य सेतु’ ऍप 2 एप्रिल रोजी लॉन्च करण्यात आलं. लॉन्चिंगच्या केवळ 13 दिवसाच्या आत 50 मिलियन डाऊनलोडचा आकडा पार करण्यात आला. आता ‘आरोग्य सेतु’ 127.6 मिलियन डाऊनलोडसह जगातील सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेलं कॉन्टेक्ट-ट्रेसिंग ऍप बनलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button