breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांची आघाडी

पुणे – राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी अनेक ठिकाणी अटीतटीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाचप्रकारे प्रतिष्ठेचा मुद्दा बनवण्यात आलेला राज्यातील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुरुवातील मागे पडलेल्या सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाच्या उमेदवार कांचन कुल या सुप्रिया सुळेंपेक्षा सात हजारहून अधिक मतांनी मागे पडल्या आहेत.

बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर यांची कन्या आणि सध्याच्या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या समोर भाजपाच्या कांचन कुल यांचे आव्हान आहे.

बारामती म्हणजे पवारांचा अभेद्य बालेकिल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी तब्बल सहा वेळा बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी बारामतीची धुरा खांद्यावर घेतली.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या जवळपास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. पण २०१४च्या निवडणुकीत सुप्रियाताईंचे मताधिक्य घटून ते फक्त ७० हजार होते. राष्ट्रवादीसाठी हा सूचक इशारा होता. या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.

अमित शहा किंवा फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचा निश्चय केला असला तरी हे आव्हान सोपे नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. या तुलनेत भाजपची ताकद कमी आहे. भाजपने बारामती जिंकण्याचा निर्धार केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button