Uncategorizedदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांसाठी Good New : रात्रभर करा नववर्षाचं स्वागत!

  • पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे काही महत्त्वाच्या नियम जारी 

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. या नववर्षाच्या स्वागतामध्ये कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे काही महत्त्वाच्या नियम जारी केले आहेत. तसेच काही नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला पुण्यातील रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांचं नवं वर्ष धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

काय आहेत नियम?
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष 31 डिसेंबरला निर्बंध घालण्यांत आले होते. यावर्षी निर्बंधमुक्त नव्या वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाही त्याच उत्साहात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतूर आहेत. या दिवशी पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

प्रशासनाची जय्यत तयारी
नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जोरदार तयारी केली जात असून यावर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 14 पथक नेमण्यात आले असून त्या व्यतिरिक्त 10 विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.या महिन्याभरात तब्बल 200 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 8 वाहने देखील जप्त करण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडे नववर्षाच्या स्वागतासाठी वन डे पार्टी लायसन्स जवळपास 24 अर्ज आलेले आहे.जवळपास 100 वन डे पार्टी लायसन्स येण्याची शक्यता अ आहे.तसेच जवळपास 1 लाख 65 हजार मद्य परवाने वाटप करण्यात आले आहे.ज्यांच्याकडे कायम स्वरुपी मद्य बाळगण्याच परवाना नसेल त्यांना वन डे परवाना देण्यात येतो.त्याची फी ही 5 रू असून ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button