breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Good News: केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणार १९ हजार कोटींचा जीएसटी परतावा

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत  आहे.  केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आला आहे. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आला आहे. देशात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १ लाख ६५ हजार कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे.

केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिलीय. यामध्ये महाराष्ट्र, युपी आणि बंगालमध्ये टेस्टिंग क्षमता १० हजारांनी वाढवत असल्याचे ते म्हणाले आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button